Covid ची दुसरी लाट, बाहेर प्रचंड अस्वस्थता. असाच मला कॉल आला. तुम्ही Motivational Madhura mam बोलत आहात का?
माझं नाव पण मधुरा आहे, मी पुण्याची.मी Exhibitions घ्यायचे पण ती पूर्ण बंद झाली आहेत, पैसे पण अडकले आहेत, काय करू, मी उगाच नोकरी सोडली असं वाटत आहे, मी व्यवसाय करू शकेन ना? अनेक प्रश्न होते , प्रचंड अस्थिरता, तणाव.